व्हॉट्सअँपवर आता मेसेज फॉरवर्ड करू शकणार नाही तुम्ही - Shree Computer Education Gadisurla

Latest

Thursday, April 9, 2020

व्हॉट्सअँपवर आता मेसेज फॉरवर्ड करू शकणार नाही तुम्ही


जेवढा चांगला उपयोग व्हॉटसअप वापरण्यात होतो तेवढाच दुरुपयोग सुद्धा होतोच. अनेक लोक व्हॉट्सअपचा गैरवापर करतात. सध्या भारतातील करोना विषाणू खूप जास्त प्रमाणात पसरत आहे. तिसऱ्या स्थरावर ह्या विषाणू ने आपले साम्राज्य पसरवू नये म्हणून सरकार कठोर पाऊले उचलत आहेत. म्हणून सरकारने मोठा निर्णय व्हॉटसअप संदर्भात घेतला आहे.
तुम्हाला आता व्हॉट्सअपवर फक्त एक मेसेज एकाच व्यक्तीला फॉरवर्ड करता येईल. व्हॉट्सअँप ग्राहक अनेक करोना बद्दल अफवा व्हॉट्सअपवर पसरवत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ह्या आधी व्हॉटसअपवर एक मेसेज पाच जणांना फॉरवर्ड करता येत होत होता. पण आता ही क्षमता कमी करण्यात आली आहे. व्हॉटसअप अपडेट केल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअपवर हे सुरू होईल. ज्या ग्रुप मधील लोक जाणीवपूर्वक फेक न्यूज, अफवा, जातीवाद बद्दल पोस्ट करत असतील तर अशावर कठोर कारवाई करण्यात येईल. ह्यात ग्रुप अडमिन आणि सदस्याचा ही समावेश असेल. अशी घोषणा महाराष्ट्र पोलिसांकडून करण्यात आली आहे.
त्यामुळे कुणीही जाणीवपूर्वक असे मेसेज फॉरवर्ड करण्याची चुकी करू नका. असे केल्यास शिक्षेला तुम्ही पात्र ठराल.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.