जन आरोग्य योजना (आयुष्मान भारत ) - Shree Computer Education Gadisurla

Latest

Saturday, January 4, 2020

जन आरोग्य योजना (आयुष्मान भारत )



पैसे नसल्याने उपचारांपासून वंचित राहणं ही भारतातील एका मोठ्या वर्गाची समस्या आहे. या समस्येसोबत लढण्यासाठीच केंद्र सरकारने आयुष्मान भारत ही योजना आणली आहे. भारतात आरोग्य सेवा क्षेत्रात नवनवीन तंत्र विकसित होत असली तरी देशातील एक मोठा वर्ग या सेवांपासून आणि उपचारांपासून वंचित आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये योग्य उपचार मिळत नाही आणि खाजगी रुग्णालयांचा खर्च गरीबांना झेपत नाही. सरकारी पातळीवरुन सातत्याने प्रयत्न करण्यात येतात, मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे हे आव्हानात्मक काम बनत चाललं आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून मोदी सरकारने आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आणली आहे.
सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात आरोग्यावर जीडीपीच्या 1.13 टक्के खर्च केला जातो. तर हाच आकडा चीनमध्ये 2.45 टक्के आणि थायलंडमध्ये 2.90 टक्के एवढा आहे. नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन च्या रिपोर्टनुसार, ग्रामीण भागातील 85.9 टक्के आणि शहरी भागातील 82 टक्के लोकसंख्येकडे कोणतंही आरोग्य विमा संरक्षण नाही. पैसे नसल्यामुळे देशात दरवर्षाला 66 लाख भारतीयांना उपचार घेणं शक्य होत नाही, ज्यामुळे ते विविध आजारांचा सामना करतात. तर ग्रामीण भागातील 24.9 टक्के शहरी भागातील 18.2 टक्के गरीब कुटुंबांना रुग्णालयाच्या खर्चासाठी कर्ज घ्यावं लागतं. दुर्दैवी बाब म्हणजे देशातील 17.3 टक्के लोकसंख्येला त्यांच्या एकूण कमाईचा 10 टक्के खर्च फक्त आरोग्यावर करावा लागतो, ज्यामुळे गरीबी कधीही पाठ सोडत नाही.
कोण आहेत योजनेचे लाभार्थी?
2011 च्या सामाजिक, आर्थिक जनगणनेनुसार, ग्रामीण भागातील 8.3 कोटी आणि शहरी भागातील 2.33 कोटी कुटुंबाचा यामध्ये समावेश आहे. जवळपास 50 कोटी जनतेला या योजनेचा फायदा होईल. नॅशनल हेल्थ एजन्सीने (एनएचए) राष्ट्रीय आरोग्य विमा अंतर्गत आयुष्मान भारत आरोग्य योजनेची वेबसाईटही लाँच केली आहे, ज्याअंतर्गत आपण या योजनेचे लाभार्थी आहोत का, याची पडताळणी करता येईल. वेबसाईटसोबतच एक फोन नंबरही देण्यात आला आहे, शिवाय रुग्णालयांमध्ये आयुष्मान मित्र असतील, जे लाभार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
तुमचं नाव कसं शोधाल?
या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात की नाही, हे पाहण्यासाठी एनएचएच्या वेबसाईटवर जावं लागेल. https://mera.pmjay.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाका. किंवा 14555 या क्रमांकावर फोन करुनही माहिती घेऊ शकता. वेबसाईटवर नाव पाहताना तुमच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी लागेल, ज्यानंतर एक ओटीपी येईल. ओटीपीने पडताळणी केल्यानंतर कोणत्याही कागदपत्रांविना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण होईल.
एसईसीसीच्या डेटाबेसनुसार, पात्रता ठरवण्यात आली आहे. ग्रामीण भागातील श्रेणीमध्ये (डी1, डी2, डी3, डी4, डी5, डी6 आणि डी7) यांचा समावेश आहे. तर शहरी भागामध्ये व्यवसायानुसार मापदंड निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये कचरा उचलणारे, भिकारी, घरकाम करणारे, बुट पॉलिश करणारे, फेरीवाले किंवा रस्त्यावर सेवा देणारे, बांधकाम कामगार, सफाई कामगार, वेल्डर, सुरक्षा रक्षक, कुली यांचा यामध्ये समावेश आहे.
आयुष्मान मित्रही मदत करणार
पंतप्रधान जन आरोग्य योजना (पीएमजएवाय) या योजनेची माहिती देण्यासाठी आणि लागेल ती मदत करण्यासाठी रुग्णालयांमध्ये आयुष्मान मित्र नियुक्त करण्यात आले आहेत. जे रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करतील. देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपैकी 29 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी ही योजना स्वीकारली आहे. त्यामुळे राज्य सरकारची यामध्ये महत्त्वाची भागीदारी असेल.
सुरुवातीला अरुणाचल प्रदेश, चंदीगड, छत्तीसगड, दादरा आणि नगर हवेली, दमन आणि दीव, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर आणि गोवा या राज्यांमधील 1280 रुग्णालयांमध्ये सुरुवातीला ही योजना सुरु होईल. आज ही योजना लाँच होत असली तरी 25 सप्टेंबरला पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीपासून या योजनेची अंमलबजावणी होईल.
कोणत्या रुग्णालयात उपचार होणार?
गरीब रुग्णांना आता खाजगी रुग्णालयातले उपचार घेणंही शक्य होणार आहे. कारण, या योजनेंतर्गत अनेक खाजगी रुग्णालयांचाही समावेश असेल. आतापर्यंत 15 हजारांपेक्षा जास्त सरकारी आणि खाजगी रुग्णालयांनी या योजनेत सहभागी करुन घेण्यासाठी अर्ज केला आहे. खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार केल्यानंतर विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी आयुष्मान मित्र मदत करतील. रुग्ण भरती करुन घेण्यापासून ते त्याला विम्याची रक्कम मिळवून देण्यापर्यंतची जबाबदारी आयुष्मान मित्राची असेल.
आयुष्मान भारत योजनेचा लाभ काय?
या योजनेंतर्गत निश्चित करण्यात आलेल्या 10 कोटी कुटुंबांना दरवर्षी उपचारासाठी पाच लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळेल. एका कुटुंबात किती सदस्य असावेत याची मर्यादा नाही.
देशातील दीड लाख गावांमध्ये आरोग्य केंद्र सुरु केले जातील, जिथे फक्त उपचारच होणार नाही, तर नियमित तपासणीही केली जाईल.
ही योजना राष्ट्रीय आरोग्य विमा योजना आणि ज्येष्ठ नागरिक विमा योजनेची जागा घेईल.
विमा संरक्षणासाठी वयाची कोणतीही अट नाही.
अगोदरपासून असलेल्या आजारांचाही यामध्ये समावेश होईल.
ही योजना कॅशलेस असेल, म्हणजेच रुग्णाने उपचार घेतल्यानंतर पैसे थेट रुग्णालयाला दिले जातील.
योजनेत 1350 वैद्यकीय सेवांचा समावेश

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.