पिक विमा योजना –
खरीप
हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून, योजनाकरिता पुढील तीन वर्षांसाठी रिलायन्स जनरल
इन्शुरन्स कंपनी लिमिटेडसोबत करार करण्यात आला आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील सहा
पिकांना विमा संरक्षण मिळणार असून नैसर्गिक आपत्ती, कीड
व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे. कर्जदार व बिगर
कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा योजना ऐच्छिक आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद व खरीप
ज्वारी पिकाचा विमा पीक योजनेत समावेश असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील सर्व
मंडळांना ही योजना लागू आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिके घेणारे कुळाने
अगर भाडेपट्ट्याने जमीन करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा
योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेंतर्गत सर्व पिकांसाठी जोखीमस्तर 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.
विमा योजनेत
सहभागी होण्यासाठी
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी विहित प्रपत्रात नजीकच्या सामुहिक सुविधा केंद्र व बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत सातबारा, आधारकार्ड, पीक पाहणी झाली असल्यास पिकांची पेरणीबाबतचे स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे संबंधित बँकेत खाते असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेकडे प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

या
नुकसानीलाही मिळणार भरपाई
प्रधानमंत्री पीक विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर विमा संरक्षण लागू करण्यात आले आहे. पिकास दुष्काळ, पूर, भूस्खलन, चक्रीवादळ, अतिवृष्टी, कीड, रोगराई, पावसातील खंड, नैसर्गिक आग, वीज कोसळणे इत्यादीमुळे होणारे नुकसान हे विमा कंपनी व राज्य शासनाचे अधिकारी यांच्या संयुक्त पाहणीनुसार विमा कंपनीमार्फत वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानीचे प्रमाण व द्यावयाची नुकसान भरपाई ठरविली जाईल. जर अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे अपेक्षित उत्पन्न हे त्या पिकांच्या उंबरठा उत्पन्नाच्या 50 टक्केपेक्षा कमी असेल तर सर्व अधिसूचित विमा क्षेत्र हे त्या मदतीसाठी पात्र राहील.

पीकनिहाय पीक विमा योजनेच हप्ता खालीलप्रमाणे
आहे
पिक विमा संरक्षित रक्कम (प्रतिहेक्टर) शेतकऱ्यांनी भरावयाचा हप्ता
सोयाबीन 45000 900
कापूस 43000 2150
तूर 31500 630
मुग व उडीद 19000 380
खरीप ज्वारी 25000 500

CSC म्हणजेच कॉमन सव्हिस सेंटरही
शेतकरी नावाची नोंदणी करू शकतो. मात्र इथं नोंदणी करायची असल्यास त्यासाठी ठरावीक
शुल्क आकारलं जातं.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.