चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी उठविले, आता गडचिरोलीची समिक्षा सुरु आहे
म्हणून हा प्रसंग आठवला, या विषयावर हि माझी पहिली कविता आहे
*तु हो तिचा आधार*
ती प्रित तुझी रे, तु तिचा हो आधार-२
प्रेमापोटी तिने तुझा, फुलविला संसार ।।धृ।।
तुझ्या साठी तिने आपले, सर्व नाते तोडले
सर्व काही अर्पुण तुला, लग्न आपले मोडले
तुझी असावी साथ,जसी दिव्यातली वात ।।१।।
तु रोवलेल्या बीजामुळे, फुटला अंकुर तिला
कन्यारत्न तिच्या पोटी, बाळ जन्माला आला
सोसयेल्या कळा तिनं, तु बाप बनाव ।।२।।
मिञाना दिली मेजवानी, बाप झाल्याची खुशी
सर्व काही आनंदाने, दारुचे गिलास हाती
ति करते गयावया, तु बाटली सोडाव ।।३।।
तुला लागली चटक, तिला वाटते सवत
माझ्या बाळाचा बाप, मला घेईल जवळ
ति आतुरतेने खुप, वाट तुझी पाहते ।।४।।
हा पिऊन बेहोश, मित्र सोडायला आला
तिच्या अंगाचा स्पर्श, त्याला मोहरुन गेला
त्याने केली जबरदस्ती, तिला वाचविल कोण ।।५।।
तिचा अंगाची ही सोय, कसे लचके तोडुन
नवरा होता पडुन, जसा मुर्दा बनुन
बाई तसी ती धावली,दिला विहीरीत जीव।।६।।
भास्कर सोनुले
माळी जलसा धानोरा
९४०४८३४९४४
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.