MPSC Result: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर; इथे बघा उत्तीर्णांची यादी - Shree Computer Education Gadisurla

Latest

Thursday, March 31, 2022

MPSC Result: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर; इथे बघा उत्तीर्णांची यादी

मुंबई, 30 मार्च: कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC Exam 2021) 2021 या वर्षातील परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना बघून ही परीक्षा 23 जानेवारी 2022 ला घेण्यात आली होती. या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचा निकाल (MPSC Prelims exams 2022 Result) आज जाहीर करण्यात आला आहे. MPSC च्या अधिकृत वेबसाईटवर (Official website of MPSC) पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची यादी (MPSC prelims Result pass list) जाहीर करण्यात आली आहे.

MPSC पूर्व परीक्षा देणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे असे विद्यार्थी थेट मुख्य परीक्षेसाठी (MPSC Mains Exam 2022) पात्र ठरले आहेत. मात्र त्याआधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काही सूचना जारी केल्या आहेत. या सूचना नेमक्या काय आहेत जाणून घेऊया.

MPSC पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षा काही अटींच्या अधीन राहून देता येणार आहे. मुख्य परीक्षेआधी (Eligibility for MPSC Mains Exam) पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची पात्रता तपासणी करण्यात येणार आहे. या पात्रता तपासणीमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील अशा उमेद्वारानंच मुख्य परीक्षा देता येणार आहे.

Advertisement

तसंच जे उमेदवार मुख्य परीक्षा देण्यासाठी आयोगामार्फत देण्यात आलेल्या तारखेच्या आधी अर्ज भरतील आणि शुल्क भरतील अशा उमेदवारांनाच मुख्य परीक्षेला बसता येणार आहे.

उमेदवारांची आवश्यक ती पात्रता तपासणी झाल्यानंतर तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

पूर्व परीक्षेचा निकाल हा कोणत्याही आरक्षणाच्या / समांतर आरक्षणाच्या / इतर मुद्यांसंदर्भात विविध मा.न्यायालयात / मा. न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात आला आहे.

प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर SMS द्वारे कळवण्यात येणार आहे.

मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवश्यक माहिती आणि परीक्षा शुल्क विहित मुदतीत दिलेल्या पद्धतीने सादर करणे आवश्यक असेल अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

उमेदवारांनी जी माहिती पूर्व परीक्षेआधी आयोगाच्या वेबसाईटवर दिली होती तीच माहिती मुख्य परीक्षेसाठी स्वीकार्य असणार आहे. याशिवाय कोणतीही माहिती असल्यास आयोगाचा निर्णय असणार आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.