अभ्यास करण्याच्या पद्धती, वाचलेले लक्षात कसे ठेवावे। Abhyas Kasa Karaycha. Study tips in Marathi - Shree Computer Education Gadisurla

Latest

Friday, April 22, 2022

अभ्यास करण्याच्या पद्धती, वाचलेले लक्षात कसे ठेवावे। Abhyas Kasa Karaycha. Study tips in Marathi

 

वाचलेले कसे लक्षात ठेवावे आणि अभ्यास करण्याच्या पद्धती (hushar honyasathi abhyas kasa karava)

मित्रानो बऱ्याच विद्यार्थी मित्रांची तक्रार असते की ते दररोज तासनतास अभ्यास करतात. पण ऐन पेपरच्या दिवशी त्यांना काहीही आठवण राहत नाही. 

जर तुम्ही टॉपर विद्यार्थ्यांना पहाल तर ते जास्त वेळ आभ्यास सुद्धा करीत नाही तरी प्रत्येक परीक्षेत ते प्रथम येतात. या मागे कारण आहे की परीक्षेत प्रथम येणारे विद्यार्थी hardwork न करता Smart work करतात. त्यांना माहीत असते की कश्या पद्धतीने अभ्यास केल्यावर त्यांना वाचलेले लक्षात ठेवायला मदत मिळणार आहे. 

म्हणून आजच्या या लेखा द्वारे मी तुम्हाला परीक्षेत अव्वल येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यास करण्याच्या पद्धती बद्दल माहिती सांगणार आहे. 

आज आपण जाणणार आहोत की Abhyas Kasa Karava. जर तुम्हाला वाचलेले लक्षात कसे ठेवावे आणि वाचलेले लक्षात राहण्यासाठी उपाय माहित करायचे असतील तर या पोस्टला शेवटपर्यंत वाचत रहा.

अभ्यास करण्याची योग्य वेळ

तसे पाहता तुम्हाला जेव्हा मन लागेल तेव्हा तुम्ही अभ्यास करू शकता पण जर तुमचे अभ्यासात चित्त लागत नसेल, तर सकाळची शांत वेळ अभ्यासासाठी योग्य आहे. सकाळी वातावरणात शांतता असते तसेच रात्रभर झोप झाल्याने शरीर आणि मन दोघेही अतिशय फ्रेश असतात. म्हणून सकाळच्या वेळी अवघड वाटणारे विषय वाचावेत.


अभ्यास करण्याच्या योग्य पद्धती (pathantar kase karave)

1) उत्सुकता-

अभ्यासात चित्त लागण्यासाठी पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे उत्सुकता. कारण जर अभ्यासाला बसण्याची तुमची इच्छाच होत नसेल तर कोणतेही उपाय करून फायदा नाही. म्हणून सर्वात आधी तुम्हाला एकदम फ्रेश व्हावे लागेल. 

शरीर व मनाला एकदम ताजे करा. यानंतर अभ्यासाला बसताना टेबल खुर्ची या सारख्या उंच वस्तू घ्या. पुरेसे उजेड आणि शांतता असलेल्या रुमात पाठीचा कणा ताठ करून अभ्यासाला बसा.


2) नियमितपणा-

कोणतीही गोष्ट जर तुम्ही नियमित करत असाल तर काही दिवसांनी शरीराला त्या गोष्टीची सवय होऊन जाते. जरी सुरुवातीला तुमचे मन अभ्यासात लागत नसेल तरीही बळजबरीने अभ्यासाला बसा. काही दिवसातच तुम्हाला याची सवय होऊन जाईल व तुम्हाला अभ्यास करण्याची आवड आपोआप निर्माण होईल. पण या साठी तुम्हाला सुरुवात करावी लागेल.

अभ्यासाला बसण्याआधीच सर्व अडथळे दूर करावे. घरच्यांना या गोष्टीची कल्पना देऊन द्यावी की तुम्ही अभ्यास करीत आहात व किमान एक तास तरी तुम्हाला आवज देऊ नये. मोबाईल, टीव्ही सारख्या अडथळ्यांना पण स्विच ऑफ करून ठेवावे. 


3) परत परत वाचणे

ज्या पण विषयाचा तुम्ही अभ्यास करीत असाल किंवा जे काही तुम्हाला वाचलेले लक्षात ठेवायचे असेल त्याला वारंवार वाचावे. मनातल्या मनात न वाचता मोठ्याने वाचून रिपीट करावे. 

पुन्हा पुन्हा वाचताना आपले पूर्ण लक्ष त्या वाक्याकडे ठेवावे. जेणे करून तुम्हाला ती माहिती लक्षात राहावी. परीक्षेत चांगले मार्क मिळवण्यासाठी अभ्यास अश्या पद्धतीने करावा.


4) लिहिणे

जर परत परत वाचून सुद्धा तुम्हाला शंका आहे की तुम्ही वाचलेले परत विसरू शकतात तर तुम्ही लिखाण पण करू शकतात. या साठी वाचन पूर्ण झाल्यावर पुस्तकात न पाहता आपल्या वहीत उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न करा. पुन्हा पुन्हा या पद्धतीने अभ्यास केल्यास अभ्यास कसा करावा हा प्रश्न तुमच्या डोक्यात येणार नाही आणि वाचलेले लक्षात ठेवायला नक्की उपयोग होईल.


5) मनाची एकाग्रता

सर्वात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट आहे एकाग्रता. कोणतीही गोष्ट पूर्ण एकाग्रतेने केल्यास त्याचे लाभ नक्कीच होतात. चांगल्या पद्धतीने अभ्यास करण्यासाठी शांत मन आणि एकाग्रतेचा आवश्यकता आहे. 

या साठी तुम्ही ध्यान आणि योग प्राणायाम करू शकतात. अभ्यासाला बसण्यापूर्वी 10 मिनिटे कोणताही विचार डोक्यात येऊ देऊ नका, आपले चित्त श्वासावर एकाग्र करा, श्वास कश्या पद्धतीने आत बाहेर होत आहे ते अनुभव करा. 


6) प्रेरणा

अभ्यास असो वा इतर कोणतेही कार्य त्याला उत्कृष्ट पद्धतीने करण्यासाठी प्रेरणेची आवश्यकता असते. या साठी तुम्हाला सेल्फ मोटिव्हेट व्हावे लागेल. आतून [प्रेरणा निर्माण करण्यासाठी तुम्ही आयुष्यात एक स्वप्न ठरवू शकतात आणि त्या दिशेने आपली वाटचाल सूर करू शकतात.  

मित्रांनो प्रेरणा मिळवण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांसाठी मराठी सुविचार << येथे क्लिक करून काही उत्तम प्रेरक सुविचार वाचू शकतात. 


मित्रानो जर तुम्ही या सरल टिप्स अनुसरल्या तर तुम्हाला पण अभ्यास लक्षात ठेवायला सोपा जाईल. आणि मग तुम्ही पुन्हा कधीही नाही विचारणार की "अभ्यास कसा करायचा" किंवा "वाचलेले लक्षात कसे ठेवावे"

याशिवाय जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये विचारू शकतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते देखील कमेंट च्या माध्यमाने लिहून पाठवा.. धन्यवाद.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.