50,000 अनुदान योजना असे चेक करा तुमचे नाव | Regular Niyamit Karj Mafi Yojana Maharashtra 2022 - Shree Computer Education Gadisurla

Latest

Wednesday, October 19, 2022

50,000 अनुदान योजना असे चेक करा तुमचे नाव | Regular Niyamit Karj Mafi Yojana Maharashtra 2022


Regular Niyamit Karj Mafi Yojana Maharashtra 2022 – मित्रांनो 2017-18, 2018-19 आणि 2019-20 या आर्थिक वर्षापैकी किमान दोन वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे आपल्या कर्जाचे परतफेड केली होती, अशा शेतकऱ्यांना 50,000 हजार रुपये पर्यंत अनुदान हे मिळणार आहे. त्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय. तुमचं नाव आलेल आहे का नाही हे कसं पहायचं या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत.



50,000 अनुदान योजना असे चेक करा तुमचे नाव

आपले नाव पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या शेजारील सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे आधार नंबर घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर कशा पद्धतीने तुमचं नाव आहे का नाही ते चेक केले जाईल हे पाहू. [ Niyamit Karj Mafi Yojana Maharashtra ]

  • तुमचे नाव पाहण्यासाठी सर्वात पहिल्यांदा इथे CSC LOGIN लॉगिन करायचं आहे.
  • सीएससी लोगिन फक्त आपले सरकार सेवा केंद्र चालक यांच्याकडे असते तिथे तुम्हाला वरती सर्च ऑप्शन दिसेल
  • यामध्ये तुम्हाला महात्मा सर्च करायचे महात्मा सर्च कराल तर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे.
  • क्लिक केल्यानंतर तिथे तुम्ही फक्त आधार नंबर टाकून शेतकऱ्याचे नाव आहे का नाही हे पाहू शकता.
  • आधार नंबर हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला शेतकऱ्याचा जो काही आधार नंबर असेल तो इथ टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लोन अकाउंट हिस्टरी वरती क्लिक करायचं.
  • जसं तुम्ही लोन अकाउंट हिस्टरी वरती क्लिक करा तर त्या शेतकऱ्याचं नाव तिथे दिसणार आहे. {Regular 50000 Niyamit Karj Mafi Yojana Maharashtra }

    Regular Niyamit Karj Mafi Yojana Maharashtra

    तर अशा पद्धतीने शेतकऱ्याचे नाव शेतकऱ्याची बँक कोणती होती ब्रांच कोणती होती तसेच लोन वर्ष लोन कधी घेतलं होतं लोन अकाउंट नंबर येईल सेविंग अकाउंट नंबर सुद्धा येईल लोन डिस्ट्रीब्यूटर दिसेल. कधी लोन दिलं होतं तसेच अमाऊंट किती दिली होती ती सगळी माहिती तुम्हाला इथे दिसणार आहे असं जर शेतकऱ्याची माहिती दिसत असेल तर त्या शेतकऱ्याचं नाव या यादीमध्ये आले आहे. त्यांची केवायसी करणं काही दिवसांमध्ये केवायसी सुरू होईल.

    जर तिथे not found काहीच माहिती दिसत नसेल तर त्या शेतकऱ्याचं नाव आलेलं नाही असं समजायचं तर अशा पद्धतीने शेतकरी आपले सरकार सेवा केंद्र शेजारील जे आहेत तिथे जाऊन आपलं नाव जे आहे ते चेक करू शकता.

    फक्त शेतकऱ्यांना आधार नंबर जो आहे तो द्यावा लागेल आधार नंबर टाकून आपले सरकार सेवा केंद्र चालक हे त्यांचे नाव आलेले आहे का नाही हे सांगू शकतील तर अशा पद्धतीने तुमचं नाव जे आहे ते तुम्ही चेक करू शकता.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.