रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेलवे मध्ये काही पदांवर भरती काढण्यात आली आहे. अर्ज प्रक्रियादेखील सुरु झाली आहे. योग्य व इच्छुक उमेदवार 23 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. अधिकृत सूचनेनुसार 26 पदांवर भरतीसाठी स्पोर्ट कोट्यातून उमेदवार निवडले जाणार आहेत.
भरतीसाठी शैक्षणिक योग्यता…
गैर तांत्रिक पदांसाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे. तसेच काही पदांसाठी दहावी पास होण्यासोबतच आयटीआय होणेही बंधनकारक आहे. महत्वाचे म्हणजे यासाठी 10 वी पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात. मात्र, त्यांना तीन वर्षांचे ट्रेनिंग घ्यावे लागणार आहे. कोणत्याही विषयात पदवी मिळविलेले उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत.
या भरतीसाठी 18 वर्ष ते 25 वर्षे अशी वयाची अट ठेवण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांचा पगार हा 5200-20200 रुपये प्रति महिना असणार आहे.
अर्ज शुल्क
सामान्य वर्गासाठी उमेदवारांना 500 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर एससी, एसटी उमेदवार आणि महिलांसाठी 250 रुपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क ऑनलाईनही भरता येणार आहे.
निवड कशी होणार…
उमेदवारांनी ज्या खेळांमध्ये प्राविण्य मिळविले आहे त्या खेळांची चाचणी घेण्यात येणार आहे. तसेच त्याने जोडलेल्या स्पर्धांची सर्टिफिकिट पाहून, पडताळून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
सोर्स : लोकमत
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.