मधु मंगेश कर्णिक यांना जनस्थान पुरस्कार ♦️
♦️ जयेष्ठ साहित्यिक आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांना प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.
♦️ सोमवारी येथे प्रतिष्ठानच्या वतीने ही घोषणा करण्यात आली. महाकवी कालिदास कलामंदिरात १० मार्चला प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
♦️ मराठी साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या जीवनावर ठसा उमटविणाऱ्या साहित्यिकाला येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे जनस्थान पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.
♦️ दर दोन वर्षांनी दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे आहे.
♦️ कथाकार, कादंबरीकार, कवी, संवाद लेखक अशी साहित्य क्षेत्रात चौफे र ओळख असलेले कर्णिक यांनी महाराष्ट्र राज्य साक्षरता आणि संस्कृती विभाग तसेच राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.
♦️ कर्णिक यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून २०१४ ते २०१९ या कालावधीत जबाबदारी सांभाळली.
♦️ परतिष्ठानच्या माजी अध्यक्षांची जनस्थान पुरस्कारासाठी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.