ई-नाम योजना (e-NAM) National Agricultural Marketing
◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्दारे 14 एप्रिल 2016 रोजी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवस) राष्ट्रीय कृषी बाजार (नाम) (National Agricultural Marketing) योजनेअंतर्गत ई-मंडी (e-NAM) चे उद्घाटन करण्यात आले.
★ ई-नाम योजनेचा उद्देश:
◆ शेतकर्यांना शेतमालाची योग्य किंमत प्राप्त करून देणे. ई-नाम योजनेचा फायदा केवळ शेतकर्यांनाच नव्हे, तर ग्राहक आणि घाऊक व्यापर्यांनाही घेता येईल.
◆ ई-नाम योजनेमुळे शेतकरी व ग्राहक यांच्यामधील दलालांची मध्यस्थी कमी होण्यास मदत होणार आहे.
◆ ई-नाम योजना प्रयोगिक तत्वावर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगाणा, झारखंड, हरियाणा व हिमाचल प्रदेश या राज्यात राबविण्यात आली. या राज्यांतील 21 ठोक मंडी बाजारात शेतकरी आपल्या 25 कृषी उत्पादन वस्तू विक्री करू शकतील.
■ ई-नाम योजनेचे लक्ष्य:-
◆ सरकारव्दारे मार्च 2018 पर्यंत देशातील 585 मंडी ई-मंडी जोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
◆ ई-नाम योजना लागू केल्यानंतर शेतकर्यांना आपला माल कुठे विकावा, किती किमतीला विकावा हे ठरविण्याचा अधिकार मिळणार आहे. ई-नाम योजनेअंतर्गत मंडी बाजार हा ऑनलाईन करण्यात येईल.
◆ ई-नाम योजनेअंतर्गत 1,60,229 शेतकरी, 46,688 व्यापारी व 25,970 कमिशन एजेंटंना अधिकृत करण्यात आले आहे. ई-नाम योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा व प्रयोगशाळेच्या निर्मितीसाठी प्रति मंडी 30 लाख रुपयांची मदत रक्कम उपलब्ध करण्यात येईल.
◆ ई-नाम योजनेअंतर्गत ई-नाम सॉफ्टवेअर व एका वर्षासाठी माहिती तंत्रज्ञान अधिकारी ही उपलब्ध करण्यात येतील.
★ Payment Banks:-
◆ पेमेंट बँक स्थापन कराव्या अशी शिफारस – नचिकेत मोर समितीने केली होती.
★ पेमेंट बँकेचे वैशिष्ट्य:-
◆ पेमेंट बँक चालू खाते उघडू शकणार ,
◆ बचत खाते उघडता येणार मात्र ,
◆ मुदत ठेवी ठेवता येणार नाही.
◆ पेमेंट बँकेत जास्तीत जास्त 1 लाख रुपयांची ठेवी ठेवता येणार.
◆ रिजर्व बँकेने ठरवल्या प्रमाणे CRR ठेवावा लागणार , तर SLR 75 % ठेवावा लागणार.
◆ पेमेंट बँकांना 25% शाखा ग्रामीण भागात उभारणे अनिवार्य असून सुरुवातीचे भाग भांडवल 100 कोटी असायला हवे.
◆ क्रेडिट कार्ड , कर्ज देता येणार नाही मात्र , Atm , डेबिट कार्ड तसेच Mutual Fund , विमा उत्पादने देता येतील.व्यवहार शुल्काद्वारे मुख्य उत्पन्न
★ पेमेंट बँक स्थापना क्रम:-
1. Airtel payment Bank – राजस्थान
2. पोस्टल पेमेंट बँक
3. PAYTM पेमेंट बँक
★ मित्रांनो अर्थशास्त्रचे लेख कसे वाटतात, आम्हाला खाली दिलेल्या Email वर नक्की कळवा, तुमचा Feedback आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो,आपल्याला लेख आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांना Forward करा.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.