History Maharashtra State Board # Chapter 4.1 1857 चा उठाव - Shree Computer Education Gadisurla

Latest

Thursday, January 14, 2021

History Maharashtra State Board # Chapter 4.1 1857 चा उठाव

 

Chapter 4.1 1857 चा उठाव

★ पार्श्वभूमी --

◆ इंग्रज व्यापारी म्हणून भारतात आले आणि साम्राज्य करते बनले. इंग्रजांनी व्यापार करण्यासाठी भारतात ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. कालांतराने तिचे भारतावरील वर्चस्व वाढत गेले. ईस्ट इंडिया कंपनीची भारतात प्रमुख दोन कामे होती एक म्हणजे साम्राज्य विस्तार करणे दुसरे म्हणजे व्यापारी शोषण करणे. इंग्रजांच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारतात अराजकता माजली होती. ईस्ट इंडिया कंपनिमुळे येथील उद्योगांचा र्‍हास झाला होता.

◆ 1857 च्या उठावा आधी झालेले काही महत्वपूर्ण उठाव खालीलप्रमाणे सांगता येतील.

◆ वेलोर मधील उठाव -1806

◆ बराकपूर – 1824

◆ फिरोझपूर – 1842

◆ 22 वी एन आय – 1849

◆ 66 वी एन आय – 1850

◆ 38 वी एन आय – 1852

◆ बरेलीचा उठाव – 1816

◆ कोळ्यांचे बंड – 1831-32

◆ संथालाचा उठाव – 1855-56

◆ इंग्रज आधिकार्‍यांच्या अनेक अन्यायवादी धोरणामुळे 1857 सारखा उद्रेक घडून आला. लॉर्ड वेलस्ली याने तैनाती फौजेचा वापर करून हैदराबाद, निजाम, आयोध्येचा नवाब,शिंदे, होळकर, पेशवे या सर्वांना मंडलिक बनवून आपला भूप्रदेश वाढवला. लॉर्ड डलहौसी सारख्या साम्राज्य वादी इंग्रज आधिकार्‍याने भारतीय राज्यांच्या दत्तक विधानास नामंजूरी दिली. राज्यांना वारसा नसल्याच्या करना वरुण डलहौसी ने झाशी, सातारा, संबलपुर, जैतपुर अशी अनेक संस्थाने खालसा केली. 1849 साली इंग्रजांनी पंजाब ताब्यात घेतला त्यानंतर ती भारतातील सार्वभौम सत्ताधीश बनली.

◆ 1757 ते 1857 या काळात इंग्रजांनी भारतीयांवर अनेक अन्याय केले. कंपनीच्या राजवटीत बेकारी वाढली. इंग्रजांनी भारतीयांवर अनेक अन्यायकारक कर लादले. नोकरी देताना इंग्रज भारतीयांसोबत भेदभाव करत असे. अनेक महत्वाची पदे इंग्रजांना मिळत असे तर खालच्या दर्जाची पदे भारतीयांना दिली जात असे. एकाच प्रकारचे पद धारण करण्यार्‍या इंग्रज व भारतीय व्यक्ति यांच्यातील वेतनामध्ये देखील खूप फरक होता इंग्रज व्यक्तिला जास्त वेतन दिल्या जात असे. तर भारतीय व्यक्तिला कमी वेतन दिले जात असे. 1857 च्या उठवास धार्मिक, राजकीय, आर्थिक व सामाजिक अशी अनेक कारणे जिम्मेदार आहेत. लॉर्ड कॅनींग गोव्हर्नर जनरल असतांना आर्थिक, सामाजिक, धार्मिक व राजकीय परिस्थितीमुळे जनतेत असंतोष निर्माण झाला. शेवटी शिपायामधील बंडाची परिणीती व्यापक लढ्या मध्ये झाली. 1857 च्या उठावात सैनिका सोबत सामान्य जनता देखील सामिल झाली ज्या मध्ये शेतकरी, कारागीर इत्यादि सामील होते. ब्रिटिश सरकारची भारतीय धर्मा बद्दलची नीती भारतीय जनतेस र्‍हास आली नाही त्यामुळे जनतेत क्रोध निर्माण झाला. इंग्रज सरकार आम्हा भारतीयांचा धर्म बुडवणार असे भारतीयांना वाटू लागले यामुळे 1857 सारखा उठाव घडून आला. या उठावाने इंग्रज शासनाच्या मुळास धक्का लावला.   

★ उठाव :--

◆  इंग्रज शासनाने सैनिकांसाठी नव्या व आधुनिक आशा एनफील्ड रायफल चा वापर करण्याचे ठरवले होते. परंतु आशा बंदुकासाठी जी कडतूसे बनवली गेली होती त्या काडतुसास डुकराची व गायीची चरबी लावलेली होती. ही बातमी बराकपूर च्या सैन्या मध्ये पसरली. बराकपूर (प. बंगाल) छावणीतील सैनिकांनी चरबियुक्त काडतूसे वापरण्यास नकार दिला. आशा सैनिकांच्या विरोधात शिस्तभांगाचा आरोप लाऊन त्यांच्या वर कार्यवाही करण्यात आली. 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे नावाच्या शिपाहिने काडतूसे वापरण्यास नकार देऊन एका इंग्रज आधिकार्‍यास ठार केले. त्यामुळे 34 वी एन आय रेजिमेंट भंग करण्यात आली व गुन्हेगाराणा शिक्षा देण्यात आली. इंग्रज सरकारने 8 एप्रिल 1857 रोजी मंगल पांडे ला फाशी दिली. ही बातमी आगी सारखी भारतीय सैनिका मध्ये पसरली व मिरत ला जाऊन धडकली. मिरत ला वादळाची सुरुवात झाली. 1857 च्या उठावाची सुरुवात झाली. 10 मे 1857 ला मिरत येथील सैनिकांनी देखील कडतूसे वापरण्यास नकार दिला आणि इंग्रजा विरुद्ध उठाव केलाआणि कैदेत असलेल्या आपल्या साथीदारांना त्यांनी सोडवले. ते सर्व दिल्लीस जाण्यास निघाले. इंग्रज आधिकारी जनरल हेवीट ने देखील भारतीय सैनिकांना आडवण्याचे साहस दाखवले नाही. 12 मे 1857 रोजी उठाव कर्त्यांनी दिल्लीवर ताबा मिळवला. तेथील इंग्रज आधिकारी लेफ्टनंट विलोबी यांनी उठाव वाल्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यास यश आले नाही. उठवाच्या सैन्याने दिल्लीतील काही युरोपीयांना ठार केले. दिल्ली बरोबर त्यांनी राजमहालवर देखील ताबा मिळवला. बहादुर शहा जफर ला उठाव वाल्यांनी सम्राट घोषित केले. लवकरच उठावाची आग उत्तर भारत आणि मध्य भारतात पसरली. लखनौ,अलाहाबाद, कानपुर, बनारस व बिहार चा काही भाग, झांशी व काही इतर परदेशात उठाव सुरू झाला.

◆ दिल्ली हातातून गेल्यामुळे इंग्रजांना खूप नुकसान झाल्या सारखे वाटले कारण की दिल्ली संपूर्ण भारताची राजधानी होती तिचा मानसिक प्रभाव संपूर्ण भारतावर होता. दिल्लीस वापस मिळवणे हे इंग्रजा साठी खूप महत्वाचे होते. पण इंग्रजांचे सुदैव अनेक भारतीय राजे त्यांना एकनिष्ठ राहिले. त्यांनी उठाव मोडून काढण्यास इंग्रजांची खूप मदत केली. उठावाच्या वेळी भारतातील बर्‍याच क्षेत्रावर त्याचा प्रभाव कमी दिसून आला.

★ लखनौ मध्ये 4 जूनला उठाव सुरू झाला. हेनरी लॉरेन्स ने युरोपियना सह व एकनिष्ठ असलेल्या अंदाजे 2000 भारतीया सह तेथे असलेल्या इंग्रज रेसिडेंसी मध्ये आश्रय घेतला. शिपायांनी इंग्रज रेसिडेंसी ला वेढा घातला त्यात हेनरी लॉरेन्स मारला गेला. होवलोक आणि ओट्रमने लखनौ जिंकण्याचा प्रयत्न केला पण त्यातही त्यांस यश आले नाही. मार्च 1858 मध्ये इंग्रज सेनापती कोलीन कंपबेल ह्याने लखनौ वर पूर्ण ताबा मिळवला.


★ 5 जून 1857 रोजी कानपूर इंग्रजांच्या हातून गेले. नानासाहेब पेशवा घोषित करण्यात आला. तेथील इंग्रज आधिकारी हयू व्हीलरने 27 जून 1857 ला शरणागती पत्करली तेथे अनेक इंग्रज मारले गेले. तेथे नानासाहेबाला त्याचा मुख्य मदतनीस तात्या टोपे याची मदत मिळाली. 6 डिसेंबर 1857 ला इंग्रज आधिकारी कॅम्पबेल ने कानपूर ताब्यात घेतले तात्या टोपे तेथून निसटला आणि झांसी ला जाऊन मिळाला.

★ जुन 1857 च्या प्रारंभी झांसी मधील सैनिकांनी उठाव केला. लक्ष्मीबाई राज्याची शासिका घोषित करण्यात आली. 3 एप्रिल 1858 रोजी हयू रोजणे झांशी वर आक्रमण करून झांशी वर पूर्ण ताबा मिळवला. बिहार मध्ये जगदीशपूर चा जमीनदार कुणवरसिंहने,बरेलीत बहादुर खानने तसेच बनारस इत्यादि ठिकाणी उठाव झाले. ते संपूर्ण उठाव दडपून टाकण्यात आले.

★ उठावची प्रमुख केंद्रे -------


◆दिल्ली------प्रमुख व्यक्ति – बहादूरशहा जफर व बख्त खां (तारीख—11,12 मे 1857 )

◆ कानपुर-------प्रमुख व्यक्ति – नानासाहेब व तात्या टोपे  (तारीख—5 जून 1857 )

◆  लखनौ --------प्रमुख व्यक्ति – बेगम हजरत महल (तारीख—4 जून 1857  )

◆ झांसी--------प्रमुख व्यक्ति – रानी लक्ष्मी बाई (तारीख—जून 1857 )

◆ इलाहाबाद--------प्रमुख व्यक्ति – लियाकत आली  

◆ जगदीशपूर--------प्रमुख व्यक्ति – कूंवर सिंह

◆ बरेली-----------प्रमुख व्यक्ति – खान बहादुर खां

◆ फैजाबाद--------प्रमुख व्यक्ति – मौलवी अहमद उल्ला

◆ फतेहपुर---------- प्रमुख व्यक्ति – आजीमुल्ला  

★ उठावाची कारणे:-

◆ 1857 च्या उठावास अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. त्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय, औद्योगिक इत्यादि कारणे आहेत.

★ प्रशासकीय व आर्थिक कारण:---

◆ इंग्रज भारतात आले आणि राज्यकर्ते बनले. इंग्रजांच्या अनेक राज्यकर्त्यांनी अन्यायाचे धोरण अवलंबविले. इंग्रजांचे राज्य आल्यामुळे अनेक भारतीय सरदांराचे पद व आधिकार लयास गेले. भारतीय लष्करातील सर्वात उच्चस्थ पदे इंग्रजासाठी राखीव होती. इंग्रजांच्या तुलनेत भारतीय सैनिकांना कमी पगार दिला जात असे. इंग्रज सरकारची कर वसूल करण्याची अन्यायकारक पद्धती मुळे शेतकरी परेशान झाले होते.


★ डलहौसी ने खालसा धोरणाचा अवलंब केला होता. अनेक कारणाने डलहौसी ने भारतीय राज्य खालसा केली. त्याने दत्तकविधानास विरोध केला. अनेक राजे रजवाड्यांची संपत्ती हडप केली. त्याच्या आधी एका इंग्रज आधिकार्‍याने तैनाती फौज पद्धतीचा वापर करून अनेक राज्यांना हैराण करून सोडले होते. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एमएच.


★ इंग्रजांच्या आर्थिक नीती मुळे भारतातील अनेक उद्योग धंद्याचा र्‍हास झाला. इंग्रजामुळे भारतातील अनेक खेडी ओस पडली. जी पूर्वीच्याकाली स्वयंपूर्ण होती.

★ धार्मिक कारणे ---

◆ इंग्रज आधिकारी हिंदू व मुस्लिम धर्माची आलोचना करीत. त्यांनी अनेक भारतीय प्रथाना बंदी आणली होती. इंग्रज क्रीश्चन धर्माचा प्रचार करणार्‍या मिशनर्‍याना प्रोत्साहण देत. क्रिश्चन धर्माचा स्वीकार करणार्‍या भारतीय व्यक्तीस सरकारी नोकर्‍या मध्ये लवकर बढती मिळत असे. यामुळे भारतीय जनतेस असे वाटू लागले की इंगज लोकांचा भारतीय लोकांचा धर्म बुडवण्याचा विचार आहे. आशा अनेक धार्मिक कारणामुळे भारतीय जनतेच्या मनात इंग्रजा विरुद्ध असंतोष धगधगू लागला.


★ लष्करी कारणे:---

◆ इंग्रज सैनिकामध्ये अनेक भारतीय सैनिकांचा भरणा होता. अनेक धर्माचे व्यक्ति इंग्रज सैन्यामध्ये सामिल झाले होते. त्यात उच्च जातीचे व नीच जातीचे सर्व समान रित्या वागवले जात होते. त्यामुळे उच्च जातीचे सैनिक त्यास स्वतःचा आपमान समजत असत. भारतीय सैनिक समुद्र पर्यटनास अशुभ मानीत होते पण इंग्रजा मुळे त्यास ते ही करावे लागले होते. शिस्तीसाठी इंग्रज आधिकार्‍यांनी भारतीय सैनिकांना दाड्या काढवयास लावल्या आशा अनेक कारणामुळे उठावास हातभार लागला.

मित्रांनो इतिहास चे लेख कसे वाटतात, आम्हाला खाली दिलेल्या mail वर नक्की कळवा, आणि आपल्याला लेख आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांना Forward करा.

Email- suryanshshende@gmail.com

Join our telegrame channel - https://t.me/shreecom01

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.