★ लॉर्ड कर्झन:----
मागील लेखावरून पुढे...
*●◆लॉर्ड कर्झन (1899-1905)◆●*
◆ लॉर्ड कर्झन हा 1899 मध्ये व्हॉईसरॉय म्हणून भारतात आला. कर्झन भारताला आशियाचा राजकीय आधारस्तंभ समजत असे.
◆ व्हॉइसरॉयपदी येण्यापूर्वी तो भारतात चार वेळा आला होता.
◆ 1899-1900 दरम्यान भारतात दुष्काळाबरोबर एन्फ्लूएंझा व मलेरियाची साथ पसरली होती.
◆ या दुष्काळाची व्याप्ती महाराष्ट्र व गुजरातमध्ये होती.
◆ दुष्काळ निवारणार्थ व्हॉइसरॉय कर्झनने 1901 मध्ये लॉर्ड मॅक्डोनल समिती नेमली.
◆ 1899 साली कर्झनने भारतीय चलन कायदा संमत करून भारतासाठी सुवर्ण प्रमाण स्वीकारले.
◆ 1901 साली वायव्य सरहद्द प्रांत निर्माण करून टोळीवाल्यांचा बंदोबस्त केला.
◆ कर्झनने पोलिस खात्यातील अकार्यक्षमता व भ्रष्टाचार आदी गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी 1902 मध्ये ॲन्ड्रू फेझर समिती नेमली.
◆ कर्झनने 1905 ला पोलीस खात्याची पुनर्रचना केली.
★ लॉर्ड मिंटो दुसरा :----
◆ हा लॉर्ड कर्झन नंतर भारताचा गोव्हर्नर जनरल झाला. यांच्या काळात प्रसिद्ध लॉर्ड मिंटो सुधारणा कायदा पारित करण्यात आला. यांच्या काळात काँग्रेस ने इंग्रजी मालावर बहिष्कार केला.
★ लॉर्ड हार्डिंग दुसरा--
◆ 1910 ते 1916 ची कारकीर्द
◆ यांच्या काळात इंग्लंड चा राजा जॉर्ज पंचम याने भारतास भेट दिली. याने भारताची राजधानी दिल्लीस हलवली. बंगाल ची फाळणी 1911 साली रद्द केली.
★ लॉर्ड चेम्सफोर्ड:----
◆ 1916 ते 1921 या काळात कार्य.
◆ यांच्या काळात अन्यायकारक रौलेट कायदा पारित करण्यात आला. यांच्या काळात जालियनवाला बाग हत्याकांड घडून आले. होमरूळ चळवळ, खिलाफत चळवळ इत्यादी चळवळ यांच्या काळात घडून आल्या. पहिल्या महायुद्धाचा प्रारंभ. भारतात जबाबदार राज्यपद्धतीची घोषणा केली.
★ लॉर्ड रिडींग:---
◆ 1921 ते 1926 या काळात पदभार सांभाळला.
★ लॉर्ड आयर्विन:---
◆ 1926 ते 1931 या काळासाठी पदभार सांभाळला.
◆ पहिली गोलमेज परिषद यांच्या काळात झाली. सायमन कमिशन चे आगमन झाले त्या कमिशन मध्ये सात सदस्य होते व त्या पैकी एकही भारतीय नव्हता त्यामुळे त्यास विरोध करण्यात आला. यांच्या काळात सविनय कायदेभंगाची चळवळ झाली. दांडी मार्च यांच्या काळात झाली. काँग्रेस ने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी यांच्या काळात केली.
★ लॉर्ड विलिंग्डन:---
◆ 1831 ते 1836 या काळात कार्य.
◆ यांच्या कारकिर्दीत दुसरी व तिसरी गोलमेज परिषद घडून आली. आंबेडकर गांधी यांच्यात पुणे करार घडून आला. जातीय निवडा प्रसिद्ध. प्रसिद्ध 1935 चा कायदा करण्यात आला.
★ लॉर्ड लिनलिथिगो:---
◆ 1836 ते 1844 या काळात कार्य केले.
◆ 1835 च्या कायद्यानुसार 1837 साली निवडणूक झाल्या. राज्यात काँग्रेस चे मंत्रिमंडळ स्थापन झाले. यांच्या कारकिर्दीत दुसऱ्या महायुद्धास सुरुवात झाली. क्रिप्स मिशन भारतात 1942 साली आले. 1942 साली भारत छोडो चळवळ सुरू करण्यात आली. राजाजी योजना मार्च 1942 ला प्रस्तुत करण्यात आली.
★ लॉर्ड वेव्हेल:---
◆ याची कारकीर्द 1944 ते 1947 दरम्यान होती. याच्या काळात सिमला अधिवेशन घडून आले. वेव्हेल योजना 14 जून 1946 ला प्रस्तुत करण्यात आली. कॅबिनेट मिशन व त्रिमंत्री मंडळ 1946 ला भारतात आले. लॉर्ड आटली ने घोषणा केली 20 मे 1947 ला. पंडित नेहरू च्या नेतृत्वाला खाली हंगामी सरकार स्थापन करण्यात आले. 2 मे 1946.
★ लॉर्ड माऊंट बॅटन हा भारताचा शेवट चा गोव्हर्नर होता व स्वतंत्र भारताच्या पहिला गोव्हर्नर होता.
★ मित्रांनो इतिहास चे लेख कसे वाटतात, आम्हाला खाली दिलेल्या Email वर नक्की कळवा, आणि आपल्याला लेख आवडल्यास जास्तीत जास्त मित्रांना Forward करा.
Email- suryanshshende@gmail.com
Join- https://t.me/shreecom01
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.