प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र # Pradhanmantri Krushi Sinchan Yojana - Shree Computer Education Gadisurla

Latest

Thursday, March 25, 2021

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र # Pradhanmantri Krushi Sinchan Yojana

 

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र 2021 पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंब थेंब पाणी देण्याची आधुनिक पद्धत म्हणजे ठिबक सिंचन.

या पद्धतीत, जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. pradhan mantri krushi sinchan yojana 

मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने दिले जाते. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६० टक्के ठिबक सिंचन एकटय़ा महाराष्ट्रात केले जाते.

तुषार सिंचन (ज्यात पाणी शिंपडणारे म्हणून ओळखले जाते) हे एक असे साधन आहे जे शेती पिके, लॉन्स, भूदृश्य, गोल्फ अभ्यासक्रम आणि इतर भागात सिंचन करण्यासाठी वापरली जाते.

ते थंड करण्यासाठी आणि वायूच्या धूळ नियंत्रणासाठी देखील वापरली जाते. तुषार सिंचन ही पावसासारख्याच प्रकारे नियंत्रित पद्धतीने पाण्याचा वापर करण्याचा मार्ग आहे.

पाणी एका नेटवर्कद्वारे वितरीत केले जाते ज्यामध्ये पंप, वॉल्व्ह , पाईप्स आणि स्पिंकलर्स असू शकतात. या सिंचनाचा वापर निवासी, औद्योगिक आणि कृषी वापरासाठी केला जाऊ शकतो.

जेव्हा पंपच्या मदतीने मुख्य पाईपद्वारे दाबून पाणी वाहू दिले जाते तेव्हा फिरणाऱ्या नोझल मधून बाहेर पडते आणि ते पिकावर शिंपडले जाते.

Pradhan Mantri Krishi Sinchayee Yojana अनुदान

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत, सन २०१७-१८ पर्यंत, प्रतिथेंब अधिक पीक घटकाखाली सुक्ष्म सिंचन व इतर घटक असे दोन उपघटक स्वतंत्रपणे राबविण्यात येत होते.

सदर दोन घटकासाठी निधी सुध्दा स्वतंत्रपणे उपलब्ध करुन देण्यात येत होता

केंद्र शासनाने संदर्भाधीन अ.क्र.६ येथील दि. १० एप्रिल, २०१८ च्या पत्रान्वये महाराष्ट्र राज्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत-

प्रति थेंब अधिक पिक घटकाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी रु.४८००० लाख नियतव्यय मंजूर केला आहे व यामधील रु.४०००० लाख निधी सूक्ष्म सिंचनासाठी व रु.८००० लाख निधी पाणीसाठे निर्मिती

जलसंवर्धनाच्या (Water Harvesting/ Water Conservation) कामावर खर्च करण्याचे सुचित केले व त्यानुसार वार्षिक कृती आराखडा तयार

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सादर योजने अंतर्गत लाभार्थ्यांना देय असलेले अनुदान खालील प्रमाणे असेल:

1) अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी – ५५ %
2) इतर शेतकरी – ४५ %

आवश्यक कागदपत्रे सिंचन योजना महाराष्ट्र

  •  ७/१२ प्रमाणपत्र
  •  ८-ए प्रमाणपत्र
  •  वीज बिल
  •  खरेदी केलेल्या संचाचे बिल
  •  पूर्वसंमती पत्र

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पात्रता

  •  शेतकऱ्याकडे आधार कार्ड असावे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र
  •  शेतकऱ्याकडे ७/१२ प्रमाणपत्र आणि 8-अ प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  •  शेतकरी एससी, एसटी जातिवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  •  जर लाभार्थ्याने २०१६-१७ च्या आधी या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील १० वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही.
  • आणि जर लाभार्थ्याने २०१७-१८ च्या नंतर या घटकांतर्गत कोणत्याही विशिष्ट सर्वे नंबरसाठी लाभ घेतला असल्यास त्याला पुढील ७ वर्षे त्या सर्वे नंबरवर लाभ घेता येणार नाही.
  •  शेतकऱ्याकडे विद्युत पाण्याच्या पंपासाठी कायमचे विद्युत जोडणी संच आवश्यक आहे. त्यासाठी शेतक-यांना वीज बिलची ताजी प्रत सादर करावी लागेल.
  •  सूक्ष्म सिंचन प्रणाली फक्त कंपनीच्या प्रतिनिधींनी तयार केलेली असावी.
  •  शेतकऱ्यांना ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात येईल.
  •  शेतकऱ्याला पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर, त्याने अधिकृत विक्रेता आणि वितरकांकडून सूक्ष्म-सिंचन संच विकत घ्यावे, ते शेतामध्ये स्थापित करावे आणि पूर्व-मंजुरी मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत खरेदी केलेल्या पावत्या अपलोड कराव्यात.

 

पात्र लाभार्थी

खालील अटींची पूर्तता करणारे शेतकरीच सदर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील

४.१ शेतकऱ्यांच्या नावे मालकी हक्काचा ७/१२ व ८-अ उतारा असावा.

४.२ सूक्ष्म सिंचन उपघटकाचा तसेच पाणी व्यवस्थापण पुरक बाबी उप घटकांतर्गत पंप संच, डिझेल इंजिन, सोलार इंजिन इ. बाबीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध असावी व त्याची नोंद ७/१२ उताऱ्यावर असावी.

७/१२ उताऱ्यावर सिंचनाच्या सुविधेबाबतची नोंद नसल्यास विहीर किंवा शेततळ्याबाबत शेतकऱ्याकडून स्वयं घोषणापत्र घेण्यात यावे.

इतर साधनाव्दारे (बंधारे/कॅनॉल) सिंचनाची व्यवस्था असल्यास संबंधित (जलसंधारण/जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र शेतकऱ्याकडून घेण्यात यावे.

४.३ सामुहिक सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास इतर संबधितांचे करार पत्र असावे. विद्युत पंपाकरिता कायमस्वरुपी विद्युत जोडणी असावी.

त्या पृष्ठ्यर्थ शेतकऱ्यांकडून मागील नजीकच्या काळाची विद्युत बिलाची प्रत प्रस्तावासोबत घेण्यात यावी.

सोलर पंपाची व्यवस्था असल्यास सोलर पंप बसवून घेतल्याबाबतचे पत्र व सोलर पंपाबाबतची कागदपत्रे प्रस्तावा सोबत घेण्यात यावीत.

४.५ शेतकऱ्याकडे आधारकार्ड असणे आवश्यक आहे. “प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र”

४.६ एखादा लाभधारक योजनेत सहभागी होण्यास पात्र आहे, मात्र त्याच्याकडे आधार क्रमांक नाही, अशा लाभधारकांना आधार क्रमांक प्राप्त होईपर्यंत,

आधार नोंदणी पावती/मतदार ओळखपत्र/पॅन कार्ड/ पासपोर्ट/ रेशनकार्ड/शासकीय कर्मचारी असल्यास ओळखपत्र/बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबूक/मनरेगा कार्ड/किसान फोटो यापैकी पूरावा सादर केल्यास योजनेचा लाभ देण्यात यावा.

४.७ अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात PFMS प्रणालीद्वारे जमा करण्यता यावी.

४.८ पात्र शेतकऱ्यास ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत लाभ देण्यात यावा. मात्र सन २०१७-१८ पूर्वी ज्या क्षेत्रावर मागील १० वर्षाच्या कालावधीत सुक्ष्म सिंचनाचा लाभ घेतला असेल अशा क्षेत्रावर लाभ अनुज्ञेय असणार नाही.

अधिक माहितीसाठी आजच नजीकच्या CSC केंद्रास भेट दया.

SHREE COMPUTER EDUCATION

Digital Gramin Sewa Kendra

C/o, Chandrashekhar Deshmukh Gadisurla

Gandhi Chouk Ward No 2 Gadisurla

Email – dgskendra@yahoo.com

Mobile -9067754259

https://shreecomputergadisurla.blogspot.com

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.