पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख - Shree Computer Education Gadisurla

Latest

Friday, April 2, 2021

पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख



 नवी दिल्ली : पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख  31 मार्चपर्यं होती . कोरोना साथीच्या आजारामुळे ती 30 जून 2021 पर्यंत . पर्यंत वाढविण्यात आली. आपण मॅसेज किंवा इनकम टॅक्सच्या वेबसाईटवर जाऊन आपला पॅन-आधार कार्ड सहजपणे लिंक करू शकता. आपण आपले पॅन-आधार कार्ड लिंक केला असेल तर आपण जाणू इच्छित असाल आपला पॅन-आधार लिंक झाला की नाही. तर आम्ही येथे एक अतिशय सोपा मार्ग सांगत आहोत. यामुळे आपण पॅन आणि आधार कार्ड लिंकचा स्टेटस काय आहे हे चेक करु शकाल. (Is your PAN linked to Aadhaar or not, Check the status)  by @shreecom01


अधिकृत वेबसाईटवरुन करा लिंक


यासाठी, आपल्याला इनकम टॅक्सची अधिकृत वेबसाईट https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/AadhaarPreloginStatus.html वर जावे लागेल. लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला दोन बॉक्स दिसतील. यापैकी एका बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल. दुसर्‍या बॉक्समध्ये पॅन क्रमांक टाका. त्यानंतर व्ह्यू लिंक आधार स्टेटस वर क्लिक करा. त्यावर क्लिक करून, जर तुमचे आधार कार्ड पॅन क्रमांकाशी जोडलेले असेल तर तुम्हाला सक्सेसचा संदेश मिळेल. जर आधार आणि पॅनचा संबंध नसेल तर त्यांची स्थिती कळवली जाईल. यामुळे आपण आधार पॅनशी का जोडलेले नाही हे जाणून घेऊ शकता


by @shreecom01


एसएमएसद्वारे करु शकता लिंक


जर पॅन आणि आधार जोडलेले नसेल तर आपण पुन्हा लिंक करण्याचा प्रयत्न करू शकता. यासाठी आपण इनकम टॅक्सच्या वेबसाईटवर जाऊ शकता. एसएमएसद्वारे पॅन आणि आधारला जोडण्यासाठी, UIDPAN <12-digit Aadhaar> <10-digit PAN> टाईप करून 567678 किंवा 561561 वर संदेश पाठवा. ज्यांनी आपले आधार कार्ड आणि पॅन लिंक केलेले नाहीत, त्यांना आज शेवटच्या तारखेनंतर लिंक केल्यास त्यांना एक हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. याशिवाय पॅन अकार्यक्षम ठरू शकते आणि बँकेची अनेक कामेही अडकू शकतात.


by @shreecom01


असे करा ऑफलाईन लिंक


पॅन सेवा प्रदाता, NSDL या UTIITSLच्या सर्विस सेंटरवर जाऊन पॅन आणि आधार लिंक केले जाऊ शकते. त्यासाठी ‘Annexure-I’ फॉर्म भरावा लागेल आणि पॅन कार्ड आणि आधार कार्डची प्रत सोबत घ्यावी लागेल. ही प्रक्रिया विनामूल्य नाही. यासाठी तुम्हाला निश्चित फी भरावी लागेल. लिंक करताना पॅन किंवा आधार तपशिलात gसुधारणा करण्यात आली की नाही यावर ही फी अवलंबून असेल. (Is your PAN linked to Aadhaar or not, Check the status) by @shreecom01

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.