फक्त १ रुपयात पिक विमा मिळणार नोंदणी करा.1 रुपयांमध्ये आता महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे - Shree Computer Education Gadisurla

Latest

Saturday, June 24, 2023

फक्त १ रुपयात पिक विमा मिळणार नोंदणी करा.1 रुपयांमध्ये आता महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे

 Vima Yojana : नमस्कार शेतकरी बांधवांनो फक्त 1 रुपयांमध्ये आता महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे व नोंदणी करण्यासाठी देखील शेतकऱ्यांना फक्त 1 रुपये खर्च येणार आहे. उर्वरित पिक विमा भरण्यासाठी जो खर्च आहे तो सर्व खर्च महाराष्ट्र शासन करणार आहे. याच्यामुळे आता महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. आज आपण फक्त 1 रुपयांमध्ये पिक विमा मिळणार याच्याबद्दल संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

शेतकऱ्यांना फक्त 1 रुपयांमध्ये पिक विमा मिळणार असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत माहिती देण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या 2016 सालीच्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी विमा हप्त्याची 2 टक्के रक्कम ही शेतकऱ्यांनी भरण्याची तरतूद आहे. आता हा भार सुद्धा शेतकऱ्यावरती न ठेवता शेतकऱ्याच्या वाट्याला जी पिक विमा भरण्याची रक्कम आहे ती रक्कम सुद्धा आता महाराष्ट्र सरकार भरणार आहे असे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

Pik Vima Yojana

शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी आता केवळ फक्त 1 रुपया लागणार आहे. या योजनेसाठी 3312 कोटी रुपयांची तरतूद राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आलेला आहे या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यापैकी हा महत्त्वाचा निर्णय आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपयात पिक विमा दिला जाणार आहे. यासाठी शेतकऱ्याला नोंदणी करणे आवश्यक आहे.

1 रुपयात पीकविमा साठी नोंदणी कोठे करावी

शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर एक रुपयांमध्ये पिक विमा मिळवण्यासाठी नोंदणी करावी लागेल. तुम्ही जर नोंदणी नाही केली तर तुम्हाला पिक विमा मिळणार नाही नोंदणी करण्यासाठी तुम्हाला पीएम किसान पोर्टल वरती नोंदणी करावी लागेल तुम्हाला जर नोंदणी करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळील महा-ई-सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन नोंदणी करावी.

👉नोंदणी साठी संपर्क -

श्री कॉम्पुटर सर्विसेस

सुरज शेंडे - 9067754259

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.