तलाठी भरती Talathi Bharti 2023 Maharashtra Talathi Bharti 2023 - Shree Computer Education Gadisurla

Latest

Wednesday, June 21, 2023

तलाठी भरती Talathi Bharti 2023 Maharashtra Talathi Bharti 2023

 राज्यासाठी एकच प्रश्नप्रत्रिका राहणार; साडेचार हजार पदांसाठी होणार परीक्षा – Talathi Bharti 2023

महसूल विभागाच्या वतीने राज्यातील रिक्त असलेल्या चार हजार 464 तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्याकरिता प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका न काढता एकच प्रश्नपत्रिका काढली जाणार आहे. विशेष म्हणजे एका परीक्षार्थी उमेदवाराला एकाच जिल्ह्यात अर्ज करून परीक्षेमध्ये भाग घेता येणार आहे. तलाठी संवर्गातील क गटातील पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यास परवानगी दिली आहे. तलाठी भरती संदर्भातील प्रारूप जाहीर करण्यात आले आहे. राज्यात एकूण चार हजार 464 तलाठ्यांची पद रिक्त असून, त्यासाठी ही भरती होणार आहे.

लिंक खुली झाल्यानंतर उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

आजपर्यंतच्या तलाठी भरती परीक्षांमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका काढून परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, यंदा भूमी अभिलेख विभागाने भरती आणि परीक्षेची कार्यवाही करण्याचे काम टीसीएस कंपनीला दिले आहे. तलाठी भरतीसाठी घेण्यात येणार्‍या परीक्षेकरिता अभ्यासक्रमही निश्चित करण्यात आला असून, संपूर्ण राज्यातील परीक्षार्थींसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे.

भरती परीक्षाकरिता लिंक ओपन झाल्यावर नोंदणी करता 21 दिवसांचा मुदत कालावधी असणार आहे. राज्यभरातून किमान पाच लाख विद्यार्थी उमेदवार ही परीक्षा देतील, असा अंदाज आहे. त्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया करून 17 ऑगस्ट किंवा 12 सप्टेंबर या दिवशी परीक्षा घेण्याची तयारी दाखवण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.