डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंग्लडला शिकायला गेले होते तेव्हाची गोष्ट - Shree Computer Education Gadisurla

Latest

Thursday, September 17, 2020

डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंग्लडला शिकायला गेले होते तेव्हाची गोष्ट



डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंग्लडला शिकायला गेले होते तेव्हाची गोष्ट
वेळ आणि पैसा वाचावा म्हणून सहा वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी दोन वर्षात पूर्ण केला. पण त्याकरिता त्यांना अहोरात्र परिश्रम करावे लागले. जगातील सर्वात मोठे ग्रंथालय ब्रिटीश म्युझियम सकाळी सात वाजता उघडायचे तेव्हा त्यात प्रवेश करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे पहिले विद्यार्थी असायचे. सकाळी ७:०० ते रात्री ८:०० वाजता ग्रंथालय बंद होईपर्यंत बाबासाहेब तेथे अभ्यास करीत. दुपारी १ ते २ ग्रंथालयाला जेवणाची सुटी असायची पण जेवणाचा वेळ वाया जावू नये म्हणून बाबासाहेब सोबत ब्रेड घेऊन जात. ग्रंथालयाच्या आत कोणतेही खाण्याचे पदार्थ नेण्यास बंदी होती, म्हणून बाबासाहेब ब्रेडचा तुकडा लपवून ठेवीत आणि भूक लागली कि पुस्तकांच्या आड तोंड लपवून पटकन ब्रेडचा तुकडा तोंडात घालीत .
एकदा बाबासाहेब ब्रेड खाताना पडकले गेले. आणि त्यांना मुख्य ग्रंथपालाकडे नेण्यात आले. ग्रंथापालाने बाबासाहेबांना वाचनालयाचा विनय भंग करण्याबद्दल हटकले तेव्हा बाबासाहेबांनी आपण तसे का करीत आहोत हे सरळ सरळ सविस्तर सांगून दिले. ग्रंथपालाला ह्या भारतीय विद्यार्थ्याचे अतिशय कौतुक वाटले. त्याने बाबासाहेबांना नुसती ताकीद देऊन सोडून दिले. रात्री आठ वाजता ब्रिटीश ग्रंथालायामधून बाबासाहेब आपल्या खोलीवर परत जेवणखाणा म्हणून तासभर विश्रांती घेत. आणि पुन्हा अभ्यासाला बसत. मग उत्तररात्र उलटून पहाटवारा वाहू लागला तरी त्यांची अभ्यासाची तंद्री (तल्लीनता) भंग होत नसे. रूमवर त्यांच्या सोबत भारतीय विद्यार्थी राहायचा. त्याला रात्री कधीही जाग आली तरी बाबासाहेब अभ्यास करतांना आढळायचे. एकदा असाच तो विद्यार्थी रात्री जागा झाला. त्याला बाबासाहेब अभ्यास करतांना आढळले. त्याने घड्याळाकडे बघितले रात्रीचे तीन वाजत होते. तो म्हणाला, मिस्टर आंबेडकर हि काय अभ्यास करण्याची तऱ्हा आहे का? अहो, करायलाही काही मर्यादा असते. अशाने तुम्ही नक्कीच आजारी पडाल. ह्यावर बाबासाहेब क्षणभर पुस्तक बाजूला करीत म्हणाले, त्याला म्हणाले मी इथे
शिक्षणासाठी आलोय खरा, पण माझा जीव भारतातच घुटमळलाय. तेथे माझे करोडो बांधव धर्म अन रुढीच्या नावाखाली माणुसकी पासून वंचित झालेत. कुत्र्यापेक्षाही लाचार अन हीन दिन जीवन ते जगत आहेत. इथला शिक्षण क्रम आटोपून मला लवकरात लवकर भारतात जायचे आहे. त्यांच्याकरिता मानवी हक्काचा लढा उभारायचा आहे.
आज माझ्याजवळ वाया घालवायला वेळ अन पैसा नाही रे असे म्हणून बाबासाहेबांनी पुन्हा पुस्तक हाती घेवुन अभ्यासाला लागले.
तो नुसता बघत राहिला.!
.
भारत भाग्यविधाते महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन व कोटी कोटी प्रणाम...
#जय_भीम
✍️....

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.