LPG सिलिंडर स्वतः घरी नेल्यास गॅस एजन्सी देते पैसे - जाणून घ्या महत्वाचे नियम # LPG Gas - Shree Computer Education Gadisurla

Latest

Thursday, December 24, 2020

LPG सिलिंडर स्वतः घरी नेल्यास गॅस एजन्सी देते पैसे - जाणून घ्या महत्वाचे नियम # LPG Gas



💁‍♂️  *LPG सिलिंडर स्वतः घरी नेल्यास गॅस एजन्सी देते पैसे - जाणून घ्या महत्वाचे नियम*


💰  LPG सिलिंडर स्वतः घरी नेल्यास गॅस एजन्सी देते पैसे, गॅस कनेक्शन घेतल्यानंतर ही अनेकांना याबाबत माहिती नाही. 


🧐   याविषयी आपण याआधी सुद्धा माहिती घेतली आहे , मात्र अनेकांनी तक्रारसाठी नंबरची मागणी केली होती , आता आपण ते सुद्धा समजून घेऊ 


💁‍♂️  *पहा कसा आहे हा नियम ?*


●  जर तुम्ही सिलिंडरची घरी डिलिव्हरी न घेता स्वतः गोडावूनमधून घेतला तर तुम्ही त्या एजन्सीकडून 19 रुपये 50 पैसे परत घेऊ शकता ,कोणतीही गॅस एजन्सी ही रक्कम देण्यास नकार देऊ शकत नाही 


●  ही रक्कम डिलिव्हरी चार्ज म्हणून सिलिंडर बुकिंग करतानाच तुमच्याकडून घेतलेली असते. सर्व कंपन्यांना सिलिंडरची ही रक्कम ठरलेली आहे


●  दरम्यान, महिनाभरापूर्वी ही रक्कम वाढवण्यात आली आहे. सुरुवातीला डिलिव्हरी चार्ज 15 रुपये घेतले जात होते , आता ती रक्कम वाढवून 19.50 पैसे करण्यात आली आहे. 


●  तसे पाहिले तर कोणताही एजन्सी चालक ही रक्कम नाकारु शकत नाही - मात्र जर एखाद्याने पैसे देण्यास नकार दिला तर तुम्ही 18002333555 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता


●  *घरघुती गॅस सिलिंडर बाबतची* - हि माहिती प्रत्येक नागरिकांसाठी खरोखर खूप महत्वाची आहे , आपण थोडस सहकार्य करा - इतरांना देखील शेअर करा

Join Our Telegram Channel - https://t.me/shreecom01

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.