प्रिय मैत्रिणी,
तू जशी आहेस तशी सुंदर आहेस.
मुलगी सावळी असेल तर तिला काहीतरी गुन्हा केल्यासारखी वागणूक मिळते. लग्नाच्या बाजारात तर प्रत्येक पुरुषाला बायको सुंदर आणि गोरीच हवी असते.
भारतीयांची हीच मानसिकता ओळखून विविध सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करणाऱ्या
अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांनी आपल्या ह्या गोऱ्या रंगाच्या क्रेझचा गैरफायदा घेत वर्षानुवर्षे “गोरं” हेच सुंदर हे आपल्या मनावर बिंबवण्यात कुठलीही कसर सोडली नाही. या कंपन्या आपली उत्पादनं विकून पैसा कमावण्यासाठी प्रसिद्ध नट -नट्यांना जाहिरातीसाठी प्रचंड पैसा देतात.
केवळ पैश्यांना महत्व देणाऱ्या आणि तत्वांशी काहीही संबंध नसलेल्या ह्या नटनट्यांच्या भाऊगर्दीत मात्र एक नटी अशीही आहे जिने आपल्या तत्वांशी तडजोड करणार नाही म्हणत फेअरनेस प्रॉडक्ट्सची दोन कोटींची जाहिरात नाकारली आहे. साई पल्लवी असे या अभिनेत्रीचे नाव आहे.
“मी कधीच सौंदर्यप्रसाधनांची जाहिरात करत नाही. मला ते मान्यच नाही. तुम्ही जसे असाल, तुमच्या त्वचेचा रंग कुठलाही असला तरीही तुम्ही स्वतःच्या रूपाबद्दल आत्मविश्वास बाळगला पाहिजे.” असे सई म्हणते.
मैत्रिणी,
अग, काळं असणं वाईट नाही,
गोरे असणे वरदान नाही!
चला, जगाला स्त्रियांकडे पाहण्याची नवी दृष्टी देऊया...
अभिव्यक्ती मध्ये सामील व्हा!
@shreecomputergadisurla
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.