उद्या जाहीर होणार इयत्ता बारावीचा निकाल # 12th Result declared tommarow. - Shree Computer Education Gadisurla

Latest

Monday, August 2, 2021

उद्या जाहीर होणार इयत्ता बारावीचा निकाल # 12th Result declared tommarow.



 राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे न झालेल्या ऐतिहासिक अशा दहावीच्या परीक्षेचा निकाल  जाहीर करण्यात आला. मात्र आता दहावीनंतर बारावीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता १२ वीचा निकाल उद्या ३ ऑगस्ट रोजी  लागणार आहे.
महाराष्ट्रात बारावीचा निकाल कधी लागणार यासंबंधीची घोषणा करण्यात आली आहे. दहावीप्रमाणे बारावीचा निकालही विशेष मूल्यांकन पद्धतीने लावण्यात येणार आहे. ४०:३०:३० या फॉर्म्युल्यानुसार निकाल लावण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या दहावी आणि अकरावीच्या मार्कांना प्रत्त्येकी ३० टक्के वेटेज आहे. तसेच बारावीच्या वर्षांतील अंतर्गत परीक्षा, असायमेन्टस यांना ४० टक्के वेटेज असणार आहे. यावरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे.
बोर्डाने mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि सीट नंबर जारी केले आहेत. कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्यात आली नाहीत. आता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, बोर्डाने HSC रोल नंबर / सीट नंबर तपासण्यासाठी लिंक ॲक्टिव्ह केली आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र १२ वी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट ) घेता येईल. 

या संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल 

1. https://hscresult.11 thadmission.org.in

2. https://msbshse.co.in

3. hscresult.mkcl.org

4. mahresult.nic.in. .

5. https://lokmat.news18.com

🔹 *Facebook Page*

🔸 *Instagram* -

💠 *Twitter*- 

◽ *Telegram Channel* - 

🔸 *Facebook Group*- 

🔹 *Blog* - 

◻️ *YouTube* -

🟢 *Whatsapp Group* - 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.