सावित्रीबाई फुले जयंती शिक्षण दिन म्हणून साजरी होणार
⚡️ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा तीन जानेवारी हा जन्मदिवस हा राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
💁♂️ आज याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.
🤔 सत्री शिक्षणातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे योगदान आणि त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
👉 या दिवशी शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे, निबंध, वक्तृत्व, परिसंवाद व एकांकिकांचे आयोजन करण्यात येईल.
🏢 सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांत, शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल.
📌 तयांच्या नावाने स्त्री शिक्षणात कार्यरत शिक्षिका, अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या यांना पुरस्कार देण्यात येईल, अशी माहिती प्रा. गायकवाड यांनी दिली आहे.
Join Our Telegram Channel - https://t.me/shreecom01


No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.